तर पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिल्याची उपरकर यांची माहिती
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड झाली असून मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे मनसेशी कुठलाही सबंध असणार नाही.या पत्रातून अप्रत्यक्षपणे उपरकर यांची हकालपट्टीच केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसे च्या पदाचा आणि पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.















