विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा रद्द झालेला दौरा आता २१ फेब्रुवारीला होणार

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे निधन झाल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा नियोजित सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला होता. आता हा दौरा बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी ते जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिली आहे.

error: Content is protected !!