वैभववाडी (प्रतिनिधी) : अचिर्णे माळवाडी कासारवाडी धनगरवाडा अरुळे उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे बाबत अचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी घेतली आहे.
दुपारनंतर विनायक जोशी (उपविभागीय अधिकारी सा.बां. उपविभाग वैभववाडी), विनायक चव्हाण शाखा अभियंता (जि.प.बांधकाम विभाग वैभववाडी) अतुल रावराणे (शिवसेना नेते) आणि लक्ष्मण रावराणे (माजी सभापती वैभववाडी)यांनी अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मध्यस्थी करून ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्यास सांगितले यावेळी शिवसेना नेते अतुल रावले यांनी ग्रामस्थांना शब्द दिला खासदार राऊत आणि पालकमंत्री चव्हाण यांचा माध्यमातून आचिरने धनगर वाडा रस्त्याचा प्रश्न सोडवणार शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी उपोषण कर्त्या ग्रामस्थांना आश्वासन दिले. या वेळी उपस्थित शिवसेना(उबाठा)नेते अतुल रावराणे, लक्ष्मण रावराणे माजी सभापती, महेश रावराणे अर्चिने ग्रा.प.सदस्य, संतोष बोडके, बाबू गुरखे, राजाराम शिंगाडे, विठ्ठल हुंबे, जनार्दन झोरे, जनार्दन बोडके, सचिन हुंबे, सावित्री झोरे, उज्वला गुरखे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












