कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने आज रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी नाटळ- सांगवे विभगिय कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेनंतर लगेचच वेशभूषा , वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धा या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत, आणि मा सौ संजना संदेश सावंत,माजी जि प अध्यक्षा, मा श्री सुरेश सावंत, माजी सभापती, सरपंच संजय सावंत, सानिका गावकर, अशोक कांबळे, विठ्ठल रासम, प्रफुल्ल काणेकर, महेश खंदारे , नाना जाधव, केंद्र प्रमूख उत्तम सूर्यवंशी, संदिप तांबे, सुशांत मर्गज आदी मान्यवर उपस्थितीत होते.













