खारेपाटण बाजारपेठेत भव्य रॅलीचे आयोजन तर खारेपाटण ऐतीहासिक किल्ल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण भूमीत आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उस्तव मंडळ खारेपाटण यांच्यावतीने उस्ताहात साजरी करण्यात आली.
यावेळी लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची खारेपाटण एस.टी. स्टँड ते बाजारपेठ मार्गे किल्ले खारेपाटण अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये असंख्य महिला भगिनी लहान मुले तसेच युवक – युवतींनी ऐतिहासिक पारंपरिक वेशभुषा परिधान करून सहभाग घेतला होता.
यानंतर खारेपाटण किल्ल्यावरील शिवकालीन दुर्गादेवी मंदिरात देवीला श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे शिवकन्यांच्या हस्ते प्रथम पूजन करण्यात आले.व शिवज्योत आणणाऱ्या मावळ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवर उपस्थितांनी व ग्रामस्थांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. तसेच किल्ल्याच्या बुरूजावर स्वराज्याचे ध्वजारोहण करून महाराष्ट्राच्या राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इसवलकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, देव काल भैरव - दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष मधुकर शेठ गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,प्रा.वसीम सय्यद, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, खारेपाटण व्यापारी असोसएशनचे अध्यक्ष प्रजाल कुबल,नंदू कोरगावकर,ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे, शीतिजा धुमाळे,अस्ताली पवार, दक्षता सुतार,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, शिवप्रेमी ऋषिकेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाला ग्रामपंचायत खारेपाटण कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण व खारेपाटण महाविद्यालयाच्या एन एस एस विद्यार्थी, गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्रचे शुभम रानम व त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी खास कोल्हापूरहुन खारेपाटण येथे शिवज्योत आणलेल्या कुमार करण भिसे व त्याचे चार सहकारी तसेच समस्त नडगिवे ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाला बाईक रॅलीने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तर जांभई-हनुमान ढोल पथक, पोंभुर्लेच्या साथीने लेझीम नृत्य सादर करून आदिनाथ कलाविष्कार गृप खारेपाटणने कार्यक्रमाला अजून बहार आणली.या सर्वांचे उपस्थितांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रम आयोजनासाठी ऋषिकेश जाधव, मंगेश गुरव, प्राजल कुबल, सुमित रोडी इत्यादी शिवप्रेमी मावळ्यांनी विशेष योगदान दिले.

























