महाराष्ट्र काल आज आणि उद्या या विषयावर होणार व्यक्त
कणकवली (प्रतिनिधी) : रविवारी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन कणकवली येथे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत,संत तुकाराम महाराज यांचे वंशज,संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्र काल आज आणि उद्या या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत.संवाद परिवार तळेरे आयोजित हे व्याख्यान आहे.
लोकमान्य ते महात्मा,कर्मयोगी लोकमान्य,महाराष्ट्राची लोकधारा,तुकाराम दर्शन या ग्रंथांचे लेखक.महाराष्ट्र मंथन या माध्यमाचे संपादक आहेत.विवेकवादी विचारसरणीचे प्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे.ना उजवे ना डावे,सम्यक संतुलित,संयमी मांडणी करणारे व्यक्तित्व महाराष्ट्रातील निःपक्षपाती विचारवंत म्हणून डॉ .मोरे यांची ओळख आहे.महाराष्ट्र काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी २५ फेब्रूवारी रोजी सायंकाळी पाच वाजता स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन कणकवली येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.













