नाजूक मनसुबे उधळले …आ “नि ” जाम धुतले

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका व्यवसायिकाला शहरातीलच काहीं ” नी ” ..”जाम ” धु धु धुवून गळ्यात चपलांचा हार घातल्याची घटना अलीकडेच घडली. लंपट गिरी करणाऱ्या त्या व्यावसायिकाचे कारनामे त्याच्या अंगलट आले आणि संयम सुटलेल्या प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेच्या नातेवाईकांनी त्याच्या दुकानासमोरच भर बाजारात सकाळीच त्याला चांगलेच धुतले. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद नसली तरी शहरात मात्र घडल्या प्रकारची जोरदार चर्चा सुरू आहे. लपंटगिरी करणाऱ्या त्या विवाहित व्यापाऱ्याचे उपद्व्याप समजताच कुठल्याच विषयात माघार घेणे अथवा हरणे माहीत नसलेले त्या प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेचे नातेवाईक एकवटले आणि त्या व्यापाऱ्याची चांगलीच धुलाई केली. या घटनेची शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

error: Content is protected !!