जय मल्हार दुर्गोबा मंडळ आचिर्णे धनगरवाडा आणि जय मल्हार मित्र मंडळ मुंबई चे आयाेजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे धनगरवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बाळूमामा स्पोर्ट्स चषक २०२४ चे भव्य हॅन्ड लॉक अंडर आम ओपन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु ७००१/ व आकर्षक चषक शिवसेना नेते अतुल रावराणे यांस कडून, द्वितीय पारितोषिक रु ५००१ व आकर्षक चषक उद्योजक प्रकाश गुरखे यांस कडून कै. सीताबाई (आक्का) गुरखे यांच्या स्मरणार्थ तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, सहभागी संघासाठी सन्मानचिन्ह, शिस्तबद्ध संघ चषक, मालिकावीर चषक, सामना वीर चषक, तरी वैभववाडीतील सर्व क्रिकेट संघांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळ मार्फत आव्हान करण्यात येत आहे.












