आचरा येथे शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवार १९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला.याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
    
त्यावेळेस शिवरायांना घडवणारी आई जिजाबाई यांचे विचार कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यानंद परब यांनी मांडले. तसेच महिला एकत्र येऊन त्यांच्यामधील एकोपा वाढण्यासाठी गेली चार वर्ष आमदार वैभव नाईक यांच्यामाध्यमातून आचरा विभागात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्याच्या संकल्पनेमुळे महिलांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.

यावेळी महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर, वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर, महिला युवती पदाधिकारी आर्या गांवकर, भारती परब, मिताली कोरगांवकर, आशा हजारे, सरिता हिर्लेकर, मनाली आर्लेकर,सुवर्णलता पांगे, सुनीता गांवकर, गीता गांवकर विभाग प्रमुख समिर लब्दे,विद्यानंद परब, राजू नार्वेकर, प्रशांत गांवकरउपस्थित होते.

error: Content is protected !!