धालवली संघ विजेता तर फोंडाघाट संघ उपविजेता
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण यांनी आयोजित केलेल्या भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवगड तालुक्यातील धालवली हा संघ अंतिम विजेता ठरला.या संघाला रोख रुपये ७३९४/- रुपये व आकर्षक चषक तर कणकवली तालुक्यातील संकेत इलेव्हन फोंडाघाट हा संघ उपविजेता ठरला.या संघाला रोख रुपये ५३९४ /- रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन .१६ फेब्रुवारी रोजी सायं.७.३० वाजता खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते संयुक्तरित्या करण्यात आले. खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार समोरील मैदानावर सलग दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता.
तसेच क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर,मुख्याध्यापक प्रकाश पाटणकर,मुंबई मंडळाचे खजिनदार दिनेश पाटणकर,बौध्दजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे सहसचिव सागर पोमेडकर,बौद्धाचार्य संतोष मधू पाटणकर, महेंद्र धर्मा पवार अनिकेत पाटणकर, स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम, खजिनदार संदीप पाटणकर,धीरज जुमलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटणचे कार्यवाह भूषण गोवळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच या क्रिकेट स्पर्धेला लागणारे सर्व चषक सचिन पाटणकर यांनी पुरस्कृत केले होते.तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अनिकेत पाटणकर व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पूजा मिलिंद कदम यांनी तर स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू व सामनावीर चषक विनोद पाटणकर यांनी पुरस्कृत केला होता.याबरोबरच खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव, मोहन पाटणकर,संतोष पाटणकर, सुलोचना अनंत पाटणकर, धीरज जुमलेकर, महेंद्र पवार, जयचंद्र जुवाटकर,संतोष हेटम आदी दानशूर व्यक्तींनी या क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचे आर्थिक सहकार्य केले.
या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फोंडाघाट संघाचा खेळाडू भाई तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून कल्पेश याला चषक देऊन गौरविण्यात आले तसेच सामनावीर म्हणून धालवली संघाचा खेळाडू ओंकार याला व मालिकावीर म्हणून याच संघाचा खेळाडू फरीद याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचशील क्रिकेट क्लब चे कार्यकर्ते विराज पाटणकर, प्रियाल पवार, ललित पाटणकर,आशिश पोमेडकर सिद्धेश पाटणकर,प्रथमेश कदम, कुणाल पाटणकर,हर्षल कदम,भरत पाटणकर,दीपक गोवळकर,राहुल पाटणकर,देवेंद्र कदम, श्रवण पाटणकर, पार्थिव पाटणकर, बाळकृष्ण पाटणकर,रवींद्र पाटणकर,संदेश पाटणकर,अमित पाटणकर,सिद्धांत पाटणकर,तरेश तुरळकर,जतीन पाटणकर आदींनी सहकार्य केले.













