शिवजयंती निमित्त कणकवली येथे विविध स्पर्धांचे आयोजन

प्रतिक्षा पाटीलचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज,कणकवली आयोजित शिवजयंती सोहळा 2023 -वक्तृत्व स्पर्धेत समता सेवा संघ, मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक प्रशालेतील इयत्ता 9 वी प्रतिक्षा संजय पाटील हिने प्रथम क्रमांक पटकवला. प्रशाला आणि संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर, कनिष्ठ महाविद्यालय समिती सदस्य सूर्यकांत तेली, पालक संदिप घाडीगावकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर , जेष्ठ शिक्षक पाटील, शिक्षिका जेष्ठ नवाळे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतीक्षाचे गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले.

error: Content is protected !!