5 दिवसांत रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरणार
आ.नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे जनतेची गैरसोय होणार दूर
कणकवली (प्रतिनिधी) : गोरगरीब जनतेचा आधारवड असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या गर्तेत सापडले होते. याबाबत आ. नितेश राणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांच्याशी मोबाईलवर सविस्तर चर्चा करत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दुपारी सिव्हिल सर्जन डॉ नागरगोजे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ इंगळे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला तातडीने भेट देत पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी सीएस डॉ नागरगोजे आणि एसीएस डॉ इंगळे यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य सहकारी स्टाफ बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामुळे जनतेला हव्या तितक्या वैद्यकीय सुविधा देण्यावर निर्बंध येत असल्याचे सांगितले. सोबतच ऑपरेशन थिएटरमधील अत्यावश्यक सी आर्म सुद्धा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असेही सीएस डॉ नागरगोजे यांनी सांगितले. यावेळी डॉ धनंजय रासम, मेट्रेन सायली तिवरेकर, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी प्रिती कोरगावकर उपस्थित होते.












