त्यांना त्याचे फळ मिळणार, आता जनताच शिशुपाल प्रमाणे घडे भरणार
शिवसेना उबाठा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांची टीका
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना -उबाठा जिल्हा कार्यकारणी सदस्य असलेले व सेवानिवृत्त माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप सरवणकर यांनी, आमदार नितेश राणे यांनी जे नुकतेच जाहीर सभेत पोलिस त्यांच्या भाषणाचे चित्रीकरण करत होते म्हणून त्याबाबत मुद्दाम व उद्धाम बेतालपणे पोलिसाचे कुटुंबा बाबत तोंड सोडले. ते सोडण्या पुर्वी त्यांनी हा विचार करायला पाहिजे की त्याला अंगरक्षक पुरविणारी पोलिसांचे राज्य प्रमुख म्हणून जबाबदारी ही त्याचे सागर बंगल्याचे बॉसनी रश्मी शुक्ला सारखे महीले वर दिली आहे. आणि तरी देखील ते असे म्हणतात , “पोलिस फक्त आपले बायको ला माझे शूटिंग दाखवतील , ते माझे काय वाकडे करू शकणार नाही, आता आमचे राज्य आहे आणि त्यांना इथे राहयाचे आहे ना ?”, हे वाक्य हे ते जाणीव पूर्वक सभेत उच्चारत होते. कारण पोलिस आपले काही व कुठेच वाकडे करणार नाही. हा गर्भित धमकी त्याला त्याचे विरुध्द चालू असलेल्या केसेस मधील सामान्य साक्षीदारा ना देवून जाणीव पूर्वक दबाव निर्माण करण्यासाठी ते वापरले आहे. आणि आता जणू पोलिस माझे गुलाम आहेत. तेव्हा ते साक्ष कामी येताना , त्यांनी लक्षात ठेवावे या करीता ते गृहमंत्री चे सागर बंगला याचा उल्लेख करतात म्हणजे गृहमंत्री पदाचा ही ते गैरवापर करीत आहेत अशी टीका शिवसेना उबाठा चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे. आमदार नितेश राणे साक्षीदारावर दबाव निर्माण करीत आहेत, म्हणून खरतर तपास यंत्रणेतील पोलिसांनी त्यांचा जामीन च रद्द व्हावा म्हणून निःपक्ष पणे कारवाई करायला पाहिजे. खरतर, त्यांना जिल्हा बँकेचे वेळी झालेले पोलिसानं कडून झालेल्या अटकेचे वेळी दरदरून चांगलाच घाम सुटला होता. घाबरूनते कोल्हापूर सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. व अंबुलन्स म्हणून ओरस कोर्टात जात होते हे आता ते लवकरच विसरले दिसत आहेत. पसत्तेचा सातबारा आपल्या नावावर झाल्या सारखे त्यांना भास झाला असावा , स्थानिक पोलिस नव्हे तर त्यांचे अंगरक्षक असलेले पोलिसांचे ही आता “नीती”धैर्य हे खास्तवले आहे हे मात्र नक्कीच अशीही कोपरखळी सरवणकर यांनी लगावली आहे.












