न्याय आपुल्या दारी !

वायंगणी ग्रामपंचायत येथे कायदेविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न

मालवण विधी सेवा समिती आणि मालवण वकील संघटन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

ऍड समृद्धी आसोलकर, ऍड प्राजक्ता गांवकर यांचे मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत येथे मालवण विधी सेवा समिती आणि मालवण वकील संघटन यांच्या संयुक्त विद्यामाने ‘ न्याय आपुल्या दारी ‘ हे कायदे विषयी मार्गदर्शन शिबीर बुधवार 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
प्रमुख मार्गदर्शक ऍड. प्राजक्ता गांवकर आणि ऍड. समृद्धी आसोलकर यांनी लोक अदालत आणि विधी सेवा समिती याबाबत माहिती दिली आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले. हा कार्यक्रम ज्ञानदीप मध्यमिक विद्यालय वायंगणी येथेही घेण्यात आला.
यावेळी उपसरपंच समृद्धी आसोलकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर, बिट अंमलदार, मुख्याध्यापक टकले, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक ग्रामस्थ, न्यायालयीन कर्मचारी कांबळी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!