माधवबागच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी न्यूरोपॅथी ( फूट ) व डायबिटीस HbA1C तपासणी शिबिर

१५०० रुपयांची तपासणी होणार फक्त ३९९ रुपयांत

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या माध्यमातून डायबिटीक न्यूरोपॅथी व डायबिटीस एचबीएवनसी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २५ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत संस्थेच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथील केंद्रात होणार आहे. यात १ हजार ५०० रुपयांची चाचणी ३९९ रुपयात केली जाणार आहे.

यात ज्या रुग्णंना बाधित भागावर त्वचा काळी पडणे, गरम किंवा थंड समजण्याची क्षमता कमी होणे, बधिरपणा, वेदना, तळपायांना मुंग्या येणे, पायाचे तळवे सपाट होणे, गँगरिंग, पायाची बोटे काढून टाकणे असे गंभीर परिणाम टाळण्यासाठी डायबिटिक फूट न्यूरोपॅथी मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच डायबिटिसमध्ये सर्वात महत्वाची तपासणी ज्यामध्ये मागील तीन महिन्याची सरासरी शुगर कळते.त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी कणकवली- ९३७३१८३८८८, कुडाळ- ९०११३२८५८१, सावंतवाडी- ७७७४०२८१८५ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!