धामापूर येथे २५ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

चौके ( अमोल गोसावी) : माधवबाग कुडाळ आणि ग्रामपंचायत धामापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते २ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय धामापूर येथे हृदयरोग, ब्लॉकेजीस, डायबेटिस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉइड, सांध्यांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परीसरातील रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन धामापूर सरपंच मानसी परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!