लोकमान्य’च्यावतीने कणकवलीत २४ रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : देशातील अग्रगण्य अशा लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि. च्यावतीने ‘महिला उन्नती उपक्रम राबविण्यात येत आहे. याच ‘महिला उन्नती’ अंतर्गत शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सायं. ४.३० वा. कणकवली येथील लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये हळदिकुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने ज्येष्ट नागरिक, महिलांसाठी नेहमीच विशेष उपक्रम, विशेष योजना राबविल्या जातात. रोजगार व इतर व्यवसाय, कामांसाठी आर्थिक मदतीचा हात देतानाच लोकमान्यच्यावतीने सामाजिक बांधिलकीही जोपासली जाते. महिलांच्या उन्नतीच्या हेतूने हळदिकुंकू समारंभ आयोजित करण्याबरोबरच त्यांच्यासाठी मनोरंजनाची खेळ पैठणीचा स्पर्धा देखील कणकवली कॉलेज मार्गावरील लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये २४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने महिलांना विशेष बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी ९४२३५११८०१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सोसायटीच्या कणकवली शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!