श्री देव रामेश्वर मंदिर त्रिंबक, जीर्णोद्धार, कलशारोहण व लोकार्पण सोहळा…!

26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, लोकार्पण सोहळा सोमवार 26 फेब्रुवारी ते शुक्रवार 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमात साजरा होणार आहे.सोमवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कलश मिरवणूक, रात्रौ 8 ते 10 स्थानिक सुस्वर भजने, मंगळवार 27 फेब्रुवारी सकाळी 7 ते 2 धार्मिक विधी, दुपारी 2 ते 3 महाप्रसाद, रात्रौ 7 ते 9 स्थानिक सुस्वर भजने, रात्रौ 9 सांस्कृतिक कार्यक्रम, 10 वाजता पार्सेकर दशवतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा, दशावतार नाट्यप्रयोग, बुधवार 28 फेब्रुवारी सकाळी 8 ते 1 धार्मिक विधी, होम-यज्ञ, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, रात्रौ 7 ते 9 सुस्वर भजने, रात्रौ 10 वाजता ट्ववेंटी- ट्ववेंटी डबलबारी सामना बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा संदिप लोके, गुरुवार 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 12 धार्मिक विधी-कलशा रोहण, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, संध्याकाळी 5 ते 7 सत्कार समारंभ, रात्रौ 9 वाजता दिंडी, गोफनृत्य-आरेकरवाडी त्रिंबक, शुक्रवार 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, संध्याकाळी 7 वाजता आरती, 9 वाजता बुवा विनोद चव्हाण, महापुरुष त्रिंबक साटमवाडी यांचे सुस्वर भजन, रात्रौ 10 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा ‘व्यकटेश पद्मावती” हा ट्रिक्सीन युक्त दशवतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.

असे कार्यक्रम होणार आहेत तरी देणगीदार, हितचिंतक, ग्रामवासीय, यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, बारा पाच मानकरी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी रघुवीर धोंडू घाडीगावकर, सिताराम यशवंत घाडीगावकर, संतोष घाडीगावकर यांच्याशी संपर्क करावा.

error: Content is protected !!