राऊत यांचा अडीच लाखांच्या लिडने विजय होणार
कणकवली (प्रतिनिधी) : प्रसध्या देशात ज्याला साधा सीबील स्कोअर समजत नाही तो केंद्रीय उद्योगमंत्री आहे. केंद्रीय उद्योगमंत्री म्हणून सिंधुदुर्गात एकही रोजगार देणारी कंपनी राणे आणू शकले नाहीत. उलट प्रहार भवन मध्ये कोअर बोर्ड चे ऑफिस घालून स्वतःच्या परिवाराला रोजगार दिल्याची टीका शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी केली. येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा अडीच लाख मतांनी विजय निश्चित असल्याचा विश्वास अतुल रावराणे यांनी व्यक्त केला. खासदार राऊत यांनी केलेल्या विकासकामांचा कार्यअहवाल असलेला लेखजोखा पुस्तिका प्रकाशन इंडिया आघाडी बैठकीत कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात करण्यात आले. यावेळी रावराणे बोलत होते.













