मोदी सरकारने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट केला ; फसवी मोदी गॅरंटी
कणकवली (प्रतिनिधी) : प्रचंड जनसंपर्क हेच खासदार विनायक राऊत यांचे सर्वात मोठे काम आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असणारी ही लोकसभेची लढाई आहे. लोकसभेला इंडिया आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा अडीच लाख मतांनी विजय निश्चित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सव्वा लाख लीड ची जबाबदारी आहे.
प्रत्येक बुथवर 125 मतांचे मताधिकक्य मिळवण्यासाठी झटून कामाला लागूया. अडीच लाखांचे मताधिकक्याने विनायक राऊत याना पुन्हा लोकसभेवर पाठवूयाअसे आवाहन कणकवली विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यअहवाल लेखाजोखा पुस्तिका प्रकाशनप्रसंगी केले. यावेळी सतीश सावंत म्हणाले की मोदींची गॅरंटी फक्त टीव्हीवर दाखवण्यासाठी असून ग्राउंडवर प्रत्यक्षात उलट स्थिती आहे. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकले नाही पण महागाई वाढवून उत्पादन खर्च मात्र दुप्पट केला. प्रत्येकाला घर देणार हीसुद्धा मोदींची फसवी घोषणा ठरली.सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची मान उंचवायची असेल तर राऊत यांचा विजय गरजेचा असल्याचेही सावंत म्हणाले.












