आमदार नितेश राणेंच्या हस्ते वागदे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : सत्तेचे विकेंद्रीकरण करत असताना त्या-त्या ग्रामपंचायतींना स्वरुप मिळाले पाहिजे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरे मोदी यांनी गेल्या १० वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वळकटीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत. ग्रामसचिवालयना अशा पद्धतीची इमारत देणे आणि सर्व प्रकारची विविध कार्यालय एकाच ठिकाणी, एका छताखाली आणली जातील. मोदी सरकारचा आम्हाला अभिमान वाटतो की जिल्ह्यातील पहिली योजना वागदे गावामध्ये सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमच्या सहकायनि होत आहे. मुळात हे ग्रामसचिवलाय म्हणण्यापेक्षा मिनी मंत्रालय म्हटल्यास हरकत नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
केंद्र सरकारच्या नमो – ११ अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सरचिटणीस महेश गुरव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा बैंक संचालक समीर सावंत, माजी जि. प. सभापती सायंडी सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, उपसरपंच शामल गावडे, तलाठी मंगेश जाधव, सर्कल अधिकारी मनीषा बोडके, पोलीस पाटील सुनील कदम, बबली राणे, आरोग्यसेवक गंगाधर पाटील, ग्रामसेवक युवराज बोराडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून लोकांना एकाच छताखाली विविध कार्यालयांचा उपभोग घेता येणार आहे. त्यामुळे तोकांची होणारी धावपळ व ताण कमी होणार आहे. त्यांचा घर ते सचिवालय दरम्यानचा खर्च देखील वाचेल आणि त्यांचे काम देखील प्रभावी होईल. म्हणून या सगळ्यांच्या प्रपलाने गावाचा विकास करणे हे त्या सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना अजून सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने ही योजना केंद्र सरकारची प्रभावी योजना असून सर्वांगीण विकास करणारी आहे, असे राणे यांनी सांगितले.
यावेळी संतोष कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच संदीप सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितेश पवार यांनी केले.
नवीन ग्रामसचिवलायात सर्व कार्यालये समाविष्ट
बागडे येथे नव्याने होणा-या ग्रामसचिवलपात उलाठी, मंडल कार्यालय, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, ग्रामसंघ कार्यालय, एम. एस. ई.वी ऑफिस, एटीएम जशी कार्यालय असणार आहेत. याचा येथील नागरिकांना मोठा फायदा देखील होणार आहे. लवकरच हे नव्याने होणारे ग्रामसविवलाय उभे राहणार आहे.












