गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारा विनायक नेरूरकर ला पोलीस कोठडी

ओरोस (प्रतिनिधी) : आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या विनायक नेरूरकर वय २५ रा. नेरूर याला एक दिवसांची पोलीस कोठडी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सुनावली आहे.

आयशर टेम्पोमधून गोवा बनावटीची दारु वाहतूक करताना आयशर टेम्पो पकडुन ३८ लाख ४३ हजार ६०० रुपयांची दारू ओरोस खर्येवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ४ मार्च रोजी पकडली होती. यावेळी विनायक नेरूरकर याला ताब्यात घेवून त्याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विनायक नेरूरकर यांना अटक करण्यात आली होती. येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात आज त्यांना हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

error: Content is protected !!