आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली प्राथमिक शाळा दुरुस्ती साठी सहा लाख रुपये निधी मंजूर

माजी सभापती मनोज रावराणे यांचा विशेष पाठपुरावा

कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणातील प्राथमिक शाळा बांधून वीस वर्षा पेक्षा अधिक काळ झाला असून या शाळेच्या इमारतीचे छप्पर कमजोर झाले असल्याने मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांनी माजी सभापती मनोज रावराणे यांना निदर्शनास आणून दिले होते.
      
त्यांनतर मनोज रावराणे यांनी तातडीने आ. नितेश राणे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली आणि काही दिवसातच वार्षिक जिल्हा नियोजनातून  शाळा दुरुस्ती साठी सहा लाख रुपयांचा निधी आ.नितेश राणे यांनी मंजूर करून दिला. तातडीने निधी मंजूर करून दिला म्हणून आ.नितेश राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे पालक आणि ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!