फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं १ व माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघांचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावातील आद्य देवस्थान श्री देव गांगो रुजेश्वर मंदिरातील परिसर सुशोभीकरण करणे यासाठी रु.२५ लाख निधी, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे लोरे तलाठी कार्यालयाला रु.२५ लाख चा निधी ( या कार्यालयासाठी तुळशीदास रावराणे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली) व लोरे नं १ कुंडलवाडी रस्त्यासाठी रु.४०लाख चा निधी प्राप्त झाला होता या कामांचे भूमिपूजन दि.०९ मार्च २४ रोजी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे,राजन चिके, कणकवली माजी सभापती मनोज रावराणे, भाजपा ग्रामिण तालुका अध्यक्ष संतोष कानडे, लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. लोरे गावाच्या विकासा साठी सदैव व तत्परतेने निधी उपलब्ध करून देत असल्या बद्दल आमदार नितेश राणे यांचे आभार सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी मानले.













