शिक्षक समिती महिला आघाडीचा महिला दिन संविता आश्रमात उत्साहात साजरा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “झरा मायेचा,प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा” हा उपक्रम जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रम पणदूर या ठिकाणी पार पडला. यावेळी महिला आघाडीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू संस्थेस दान रूपाने सुपूर्द करण्यात आल्या.
“काल त्या होत्या म्हणून आम्ही आज पाहिला, कृतार्थ भाव म्हणून थोडासा सेवाभाव वाहिला”अशा टॅग लाईन खाली करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब, शिक्षक समितीचे राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, शिक्षक नेत्या सुरेखा कदम,शिक्षक बँक अध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सल्लागार नितीन कदम,महिला जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, महिला सरचिटणीस वैभवी कसालकर, राज्य महिला सदस्य नीलम बांदेकर, संचालक चंद्रसेन पाताडे, ऋतुजा जंगले,जीवन आनंदचे विश्वस्त किसन चौरे, सल्लागार सुगंध तांबे, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड, वेंगुर्ला अध्यक्ष सीताराम नाईक, सचिव प्रसाद जाधव, संघटक ईश्वरलाल कदम, निलेश ठाकूर, दिनेश जंगले, सतीश राऊळ, महिला आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष श्रेया नानचे, जिल्हा प्रवक्ता रश्मी आंगणे, कणकवली महिला तालुकाध्यक्ष नेहा मोरे, कोषाध्यक्ष सारिका पवार, सल्लागार ममता सावंत, सदस्य प्रियजा राऊत, वृषाली पावसकर, सुलक्षणा केंद्रे, महिला जिल्हा कार्यकारणी सदस्य मेखला कदम, उन्नती कराळे, रेखा वंटे, महिला जिल्हा उपाध्यक्ष रिया सांगेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष शिल्पा जाधव, अनिता शिर्के, शिल्पा गोठोस्कर,महिला शिक्षक नेत्या प्रतिमा पेडणेकर, वेंगुर्ला महिला शिक्षक नेत्या अनिता रॉड्रिग्ज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला आघाडी मार्फत सुमारे ४५ हजाराचे जीवनावश्यक साहित्य जीवन आनंद संस्थेस प्रदान करण्यात आले.तसेच यापुढेही संस्थेस सहकार्य करण्याचे सूतोवाच संघटना पदाधिकारी यांनी केले. यावेळी बोलताना संदीप परब यांनी शिक्षक समितीच्या सामाजिक भावनेतून केलेल्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.किसन चौरे यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.यावेळी राजन कोरगावकर,विठ्ठल गवस,सुरेखा कदम, नितीन कदम, निकिता ठाकूर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा महिला सरचिटणीस वैभवी कसालकर यांनी केले.











