गावठी बाँब पेरल्याच्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : खाजगी बागेत गावठी बाँब पेरून ठेवल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राजू जयराम पवार ( वय 40, रा. सौंदाळे, ता. देवगड ) याचा जामीन अर्ज प्रधान सत्र जिल्हा न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी राजू पवार याने कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील जयराम रामकृष्ण वारंग यांच्या बागेत जिवंत गावठी बॉम्ब ठेवले होते. ही घटना 8 मार्च 2024 रोजी घडली होती. याबाबत जयराम वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजू पवार याला अटक करून त्याचा साथीदार विधिसंघर्ष बालक याला ताब्यात घेण्यात आले होते. जिवंत 9 गावठी बॉम्ब पोलिसांनी जप्त केले होते. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी राजू पवार याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी हरकत घेतली. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, आरोपी कातकरी समाजातील असून त्याचा कायमस्वरूपी नेमका ठावठिकाणा नाही, जामीन मिळाल्यास खटल्याच्या सुनावणी कामी हजर राहण्याची शक्यता कमी आहे, पुन्हा गावठी बॉम्ब जमिनीत पेरून मानवी तसेच जंगली प्राण्यांच्या जीवितास हानी पोचवू शकतो. सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी पवार चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

error: Content is protected !!