कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत गुरुवारी जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील शिक्षक मुकेश पवार यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच त्या संबंधित घोषवाक्य विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली. त्याचप्रमाणे जागतिक वन दिनाचे महत्त्व सांगणारे विविध व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. हा कार्यक्रम विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण कणकवली यांच्यावतीने परिक्षेत्रातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके, हरित सेना शिक्षक मुकेश पवार, रिया गोसावी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करण्याचे व वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांनीही विद्यार्थ्यांना वनांचे रक्षण करण्याचे तसेच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.











