ऍड.राजेंद्र रावराणे यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा राहा-पोईप, ता-मालवण यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत करून तसेच बांबूच्या दांड्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केलयाच्या गुन्ह्यातून संतोष यशवंत पाटील, राहा-मु.पो.पोईप, ता-मालवण याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर देवकाते यांनी 21 मार्च रोजी रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. राजेंद्र व्ही.रावराणे, अँड. प्राजक्ता गावकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 7 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा राहा-पोईप, ता-मालवण असे दोघे त्यांच्या घराच्या पुढच्या पडवीत बसून त्यांच्या घरी असलेल्या ब्राह्मण भोजनाच्या कार्यक्रमासाठी लागणारे नारळ सोलत होते. त्यावेळी संतोष यशवंत पाटील, राहा मु.पो.पोईप, ता. मालवण हे सदर ठिकाणी येवून काहीही कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत केली. तसेच बांबूचा दांडा घेवून फिर्यादी यांच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केली.तसेच सदर बांबूचा दांडा फिर्यादी यांचा मुलगा कु.स्वप्निल याच्या पाठीवर मारून त्यालाही दुखापत केली असा आशयाची फिर्याद दिलेवरून संतोष यशवंत पाटील, राहा- मु.पो.पोईप, ता-मालवण याचे विरुद्ध मालवण पोलीस स्टेशनमध्ये भा.द .वि कलम ३२६, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा रजिस्टर नं. ९९/२०१८ येथे गुन्हा नोंद होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जेष्ठ विधिज्ञ ऍड राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद करताना फिर्यादी व आरोपी हे दोघे sakkhe भाऊ आहेत. दोघांमध्ये इस्टेटीवरून आपापसांत वाद होते. घटनास्थळी मुद्देमाल जप्ती पंचनामा पोलिसांनी उशिरा केला असून त्यामुळे संशयाला वाव आहे, फिर्यादी व अन्य साक्षीदार यामच्या जबाबातील विसंगती आदी बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. ऍड. राजेंद्र रावराणे यांच्या यशस्वी युक्तिवादा नंतर या गुन्ह्यातील आरोपी संतोष पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.












