वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉल जेसीबी च्या सहाय्याने हटविण्यास सुरवात
जेसीबी च्या सहाय्याने स्टॉल हटविताना स्टॉल धारकांचे अश्रु अनावर
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांनी आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या मग आम्ही स्टॉल हटवितो असा आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायत समोर उभ्या असलेल्या जेसीबी वर ठिय्या मांडला होता. उपोषण करणाऱ्या स्टॉल धारकांनी स्वतः आधी आपले स्टॉल काढावे मग आम्ही आमचे स्टॉल हटवतो असे काही स्टॉल धारकांचे मत होते यावरून स्टॉल धारकांमध्ये देखील सकाळी फुट पडलेली पहायला मिळत होती. अखेर आज दुपारी वैभववाडी नगरपंचायत चे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी जेसीबी च्या सहाय्याने स्टॉल हटविण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर आपले स्टॉल हटविण्यास स्टॉल धारकांची तारांबळ उडाली आहे.यावेळी स्टाॅल हटवितांना स्टाॅल धारकाना अश्रू अनावर झाले हाेते.