24 लाख 90 हजारांच्या अवैध दारुसह 37 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

होळी दिवशी कणकवली एक्साईज पथकाची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने हुंबरट तिठा कणकवली येथे आज सकाळी ५.३० वा च्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर वाहन तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईनुसार एक टाटा कंपनीचा चार कंपार्टमेंट असलेला टँकर क्रमांक GJ १२ AY २३६ मध्ये छुप्या पध्दतीने वाहतूक होत असताना गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा राज्यनिर्मित विदेशी मदयाचे ४२५ बॉक्स जप्त करण्यात आले. मिळून आलेल्या दारु साठ्याची अंदाजे किंमत रु. २४,९०,०००/- व टँकरची किंमत रु. १३,००,०००/- व इतर मुद्देमाल असा एकूण रु. ३७,९५,०००/- किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक प्रभूलाल भंवर लाल, वय ३४ वर्षे, रा. दंतेडी, धुंवाला, तहसील मांडल, जिल्हा भीलवाडा-राजस्थान ३११ ८०४ याला ताब्यात घेवून रिमांडकामी हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदर कारवाई मनोज शेवरे अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन.एल. शिंदे,एस.डी. पाटील दुय्यम निरीक्षक, जे.एस. मानेमोड, दुय्यम निरीक्षक,एस.एस. चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एस.एस. कुवेसकर महिला जवान ब.क्र. १० यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये मदतनीस म्हणून खान व शहा यांनी मदत केली.

सदर गुन्हयाचा पुढील तपास एन.एल. शिंदे,निरीक्षक कणकवली करीत आहेत.

error: Content is protected !!