वैभववाडी तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माध्यमिक कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण

शिक्षक भारतीने विविध पुरस्कार देऊन केला गुणगौरव

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल संघटनेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचे कौतुक केले जाते. या पुरस्कारासाठी निवड जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्ष तसेच सचिव यांच्या नेतृत्वाखाली केली जाते. या वर्षी वैभववाडी तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी पार पडलेल्या शिलेदारांना विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आदींचा समावेश आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली वैभववाडी येथे संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी सचिव तथा माध्यमिक पतपेढी चे तज्ञ संचालक सुरेश चौकेकर, उपाध्यक्ष जनार्दन शेळके, सुनील जाधव, सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, संघटक आकाश पारकर, संचालक व मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय मारकड, कणकवली तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रसाद मसुरकर, कार्याध्यक्ष संजय भोसले, सचिव संतोष राऊत, महादेव मोटे, बांबुळकर, देवगड तालुका रूपेश बांदेकर, सागर फाळके, शिक्षक भारतीचे जिल्हा पदाधिकारी व संचालक विद्या शिरसाट, तालुका अध्यक्ष अविनाश कांबळे, सचिव स्वप्निल पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

वैभववाडी तालुका पुरस्कार विजेते व पुरस्कार पुढीलप्रमाणे-

गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार – पुरुषोत्तम कोकाटे (नाधवडे हायस्कूल नाधवडे)

वि. स. खांडेकर ग्रंथ मित्र पुरस्कार – संतोष पवार (श्री माधवराव पवार हायस्कूल कोकिसरे)

अप्पासाहेब पटवर्धन शिक्षकेतर पुरस्कार – नागोजी पांचाळ (माध्यमिक विद्यालय करूळ), राजाराम माने (छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले तिरवडे), सदानंद गोसावी (माध्यमिक विद्यालय लोरे)

स्वामी विवेकानंद गुरु पुरस्कार – धनाजी भोसले (शोभना नारायण विद्यालय नानिवडे), सचिन क्षीरसागर (नवभारत हायस्कूल कुसुर), मिलिंद मेस्त्री (स्वामी विवेकानंद हायस्कूल तिथवली), प्रकाश गोसावी (अभिनव विद्यामंदिर सोनाळी)

राजा रविवर्मा कलारत्न पुरस्कार – विनोद जाधव (छत्रपती शिवाजी विद्यालय नेरले तिरवडे)

सिंधू रत्न क्रीडा पुरस्कार – संदेश तुळसणकर ,(अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), नझरुद्दीन जमादार ( उर्दू माध्यमिक विद्यालय उंबर्डे कोळपे), शंकर वाघमोडे ,(माध्यमिक विद्यालय उंबर्डे)

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार – संजय राठोड (माध्यमिक विद्यालय उंबर्डे), शंकर माळवी (विकास विद्यालय सडूरे अरुळे)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार – दीपा भरडकर, (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), विशाखा कांबळे (माध्यमिक विद्यालय कुर्ली ),

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – स्वप्निल पाटील (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे)

गुरुवर्य साने गुरुजी पुरस्कार – विनोद गोखले (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे)

अब्राहम लिंकन आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार – अविनाश कांबळे ( न्यू इंग्लिश स्कूल हेत), दीपक घाटगे(माध्यमिक विद्यालय करुळ)

माझी शाळा! सुंदर शाळा!! शिक्षक भारती पुरस्कार
१. माध्यमिक विद्यालय करुळ.
२. छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले तिरवडे
3. कुर्ली माध्यमिक विद्यालय कुर्ली

जीवन गौरव पुरस्कार- मीना बोडके (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), शिरीष शेंबवळेकर (शोभना नारायण विद्यालय नानिवडे), धनाजी पाटील (माध्यमिक विद्यालय लोरे), सुधाकर पुरीबुवा (श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), बळवंत धनवडे (माध्यमिक विद्यालय, लोरे), सीमा पालकर (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे) , राजाराम बिडकर (छत्रपती शिवाजी विद्यालय, (नेरले तिरवडे), या सर्व पुरस्कार विजेत्या सत्कारमुर्तींचे शिक्षक भारती संस्थापक अध्यक्ष आम.कपील पाटील, अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!