ऐन उन्हाळ्यात पसरला थोडासा गारवा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळणाऱ्या रिमझिम पावसामुळे अनेकांची धावपळ होताना दिसून आली. वाढती उष्णता लक्षात घेता अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.












