धक्कादायक ! नवविवाहित सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार

नराधम सासऱ्याला पोलिसांनी केले गजाआड

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुलाच्या लग्नानंतर आपल्या नवविवाहित सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४  या कालावधीत तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. संशयीत आरोपीला वैभववाडी पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडिता ही दिव्यांग असून 28 डिसेंबर रोजी तिचे लग्न झाले होते. लग्नाच्या तीन दिवसानंतर नवरा व सासू आपल्या दुकानात गेली होती. तर सासरे व पीडिता घरात होते. यावेळी रात्री ८ वाजता सासऱ्याने जबरदस्ती आतल्या खोलीत नेऊन बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

घडलेला प्रकार पीडितेने आपल्या आई ला फोन वरून सांगितला. त्यानंतर आई घरी आली तीने पीडितेच्या सासूला जाब विचारून नवऱ्याला समज देण्यास सांगितले मात्र नवरा ऐकत नाही मी काय करू असे उत्तर दिले. त्यानंतर सासऱ्यांनी १३ फेब्रुवारी ला माहेरी सोडले. पाच दिवसानंतर पीडितेला तीच्या आई ने पुन्हा सासरी आणून सोडले. त्यानंतर सासऱ्यांनी मारहाण करून पुन्हा जबरदस्ती बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर तीन महिन्यात सासऱ्याने पाच ते सहा वेळा बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सासऱ्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.

error: Content is protected !!