बांदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कृषी प्रधान गांव नाैकिक असलेले व निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृद्ध असलेले विलवडे गावात सात दिवशीय शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विलवडे चव्हाटयावर होळी आवारात गावातील मानकरी,ग्रामस्थ, व सर्व भाविकांनी युवकांपासून आबालवृद्धानी धुळवट मारल्यानंतर रंग लावून होळी उत्सवाचा आनंद लुटला.
जेष्ठांच्या व गाव मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे धार्मिक रीतीरिवाज , संस्कृती व परंपरा याचे जतन करीत आहे. शनिवारी सायंकाळी या नावणं होळी कडे नारळ ठेवून महा गाराणे घालणे. घोडेमोडणी, नारळ तोंडणी आदि कर्यक्रमात उत्साहात साजरे झाले. त्यानंतर ‘ धूळवड ‘ मारून रोबाटां मारत पिपळेश्वर येथे होळीचा नारळ तोडणी केल्यानतर नदीवर आघोंळ केल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता झाली. उद्या रविवारी सकाळ पासून संध्याकाळ,रात्री उशिरापर्यत देव प्रत्येकांची घरी घेत न्हानव्हंनाचा देण्यांचा कार्यक्रम होणार आहे.












