देवगड (प्रतिनिधी) : महाळुगे येथील सुरेश तुकाराम घाडीगावकर याला विकत घेतलेल्या झाडाच्या मोबदल्यापोटी दिलेला सत्तर हजार रुपयांचा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्याचे कारणामुळे अनादरीत झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात येथील रहिवासी कमलुद्दीन अ डोंगरकर याला देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. वाळके यांच्या न्यायालयाने एक महिना तुरुंगवास आणि रु. 85 हजार रुपयांचा दंड एवढी शिक्षा ठोठावली आहे. याकामी फिर्यादीचे वतीने अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. अन्वी कुळकर्णी, अँड. वीणा लिमये व अँड. अपर्णा पराजंपे यांनी काम पाहिले.
सन २०१७ साली महाळुगे येथील फिर्यादीचे मालकीच्या जमिनीतील आंबा, हेळा, फणस, गाणे या प्रकारातील मौल्यवान झाडे आरोपीने विकत घेतली होती. सदर विकत घेतलेल्या झाडांचा मोबदला अदा करण्यासाठी आरोपीने डोगरकर याने फिर्यादी गाडी यांना रक्कम रु. 70 हजार रुपये चा बनादेश दिला होता. सदर धनादेश आरोपीचे खात्यात पैसे नसल्यामुळे अनादरीत झाल्याने आरोपीविरुध्द धनादेश अनादराचा खटला देवगड न्यायालयात चालला होता. फिर्यादीचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादामुळे व सादर केलेले पुरावे ग्राहय मानत से देवगड न्यायालयाने आरोपीला 1 महिने कारावास आणि रुपये 85 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.