छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रालय – कणकवलीत विद्यामंदिरच्या पटांगणावर
कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार वस्तू संग्रहालयाची बस फेरी आज कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आज हि बस कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल च्या पटांगणावर दाखल झाली. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कांबळे सर, वणवे सर, राणे सर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, प्रदीप मसूरकर, सुजित जाधव, सचिन आचरेकर, प्रसाद चव्हाण, महेश राणे यांनी बसचे स्वागत केले.
एका मागणीवरून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने बस पाठवून सहकार्य केले त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हि संधी उपलब्ध झाली त्याबद्दल या स्तुत्य उपक्रमाचे शिक्षक व पालकांनी कौतुक केले.
विद्यमंदिर हायस्कुलच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांना “म्युझियम ऑन व्हील्स” टीमने प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना बसमध्ये संग्रहित असलेल्या वस्तू प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या.शिवकालीन नाणी, दगडी हत्यारे, बाहुबली प्रतिकृती, कोल्हापुरी साज, लघुचित्र, चाकावरील पक्षाची मृण्मुर्ती, चंद्रगुप्त दुसरे यांचे नाणे,नक्षीदार वस्त्र अशा अनेक प्राचीन वस्तूंचा यात समावेश होता.हे सर्व पाहत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमलला होता.