डॉ विद्याधर तायशेटे यांनी जपला माणुसकी धर्म ; जखमी रुग्णाला स्वतःच्या कारमधून नेले हॉस्पिटलमध्ये

छत्रपती शिवाजी चौकात सर्व्हिस रोडवर वाढते अपघात

गतिरोधक बसविण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व्हिस रोडवर दोन मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात वरवडे येथील गणेश राणे या मोटरसायकलस्वराच्या उजव्या पायाचा अंगठा तुटला . हा अपघात आज दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी घडला. त्याचवेळी तिथून जात असलेले सुप्रसिद्ध सर्जन डॉ विद्याधर तायशेटे यांनी जखमी गणेश याला आपल्या ऑडी कारमधून आपल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेऊन तुटलेल्या अंगठ्याच्या टाके घालून त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले. जखमी मोटरसायकल स्वाराला रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःच्या महागड्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये दाखल करून डॉ विद्याधर तायशेटे यांनी माणुसकी धर्म जपला आहे. फ्लायओव्हर खालील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मंडळ कडून येणारी वाहने विशेषतः दुचाकी आणि एसटी स्टँड च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.कारण एसटी स्टँड कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील गतिरोधक म्हणून लावलेले रबरी रंबलर नाहीसे होऊन रस्ता गतिरोधकाशिवाय मोकळा झाला आहे. सबंधित यंत्रणेने या वाढत्या अपघातांची तात्काळ दखल घेत गतिरोधक बनवावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!