एकदंत फुड अँड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांचा पुढाकार
वैभववाडी (प्रतिनिधी) : ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली यांच्या सहकार्याने आणि एकदंत फुड अँड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांच्या पुढाकाराने कै. शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या जयंतीनिमित्त 4 एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 4 एप्रिल रोजी गडमठ गावठाणवाडी येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्रतपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आपली स्वर्गीय आई शिला बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवत प्रणय बांदिवडेकर यांनी या सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते होणार आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, गडमठ सरपंच मालती शेटे, स्पेक्टो मार्ट कणकवलीचे मंगेश चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी मोबा.9049341282 अथवा मोबा. 9930599354 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बांदिवडेकर यांनी केले आहे.














