ट्रक मोटरसायकल च्या अपघातात एक गंभीर दोघे किरकोळ जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : ट्रक मोटारसायकलच्या विचिञ अपघातात एक पादचारी गंभीर जखमी . तर मोटारसायकलवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ७.३० वा. सुमारास शुकनदी पुलाजवळ घडला. या अपघातात  गंभीर रामचंद्र आत्माराम रावराणे वय ६५ रा एडगाव इनामदारवाडी  यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.  अपघातामुळे तळेरे गगनबावडा मार्गावर काही वेळ वाहानचालकांच्या विस्कळीत झाली होती.

गगनबावड्याकडून वैभववाडीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने शुकनदी पुलाजवळ रस्त्याच्याकडेला मिञासोबत मोटारसायकलवर बसून बोलत असणाऱ्या मोटारसायकला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलसह तिघेही रस्त्यावर पडले. तर वैभववाडीकडून एडगावकडे चालत जात असलेले रामचंद्र रावराणे यांच्यावर अंगावर  मोटारसायकल धडकली. या अपघातात रावराणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त स्ञाव झाला. त्यांना वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन अधिक  उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोटार सायकलस्वार शिवाजी राठोड, बबलु पवार व त्यांचा मिञ रतन बक्षी रा.वैभववाडी  किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान ट्रकचालक अपघातानंतर ट्रक रस्त्यावर सोडून पसार झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!