कणकवली (प्रतिनिधी) : माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा 50 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी कनेडी सांगवे येथे साजरा करण्यात आला. वरवडे गावचे युवा उद्योजक अचित कदम यांनी माजी पं स सभापती यांच्यासह संदेश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित वरवडे माजी उपसरपंच आनंद घाडी, सुभाष मालंडकर, प्रदीप कदम, सोहेल खान, निखिल आचरेकर, सागर राणे, मंदार मेस्त्री, सलमान शेख यांनीही सावंत यांचे अभिष्टचिंतन केले
संदेश सावंत यांचे अचित कदम यांच्याकडून वाढदिनी अभिष्टचिंतन











