कणकवली (प्रतिनिधी) : वागळे आर्यादुर्गानगर येथील सुधाकर यशवंत अवसरे (वय ६६) यांचे रविवारी ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ८.३० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर अवसरे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुलगे, पुतण्या, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर अवसरे यांनी सुरुवातीला रिक्षा व्यवसाय केला आणि नंतर खानावळ व्यवसाय केला. हॉटेल व्यावसायिक वैभव आणि एचडीएफसी बँकेच्या देवगड शाखेतील प्रसाद अवसरे यांचे ते वडील तर बांधकाम व्यावसायिक श्री हर्षद अवसरे यांचे काका होत.
वागदे येथील सुधाकर अवसरे यांचे निधन












