कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहती च्या विकासासाठी झटणारे, गावच्या विकासासाठी प्रवाहाच्या विरोधात सुद्धा जाऊन उभा राहणारे व्यक्तीमत्व म्हणून अनंत पिळणकर यांची ओळख आहे. कुर्ला देवी च्या देवस्थान चा वाद मिटवण्यात अनंत पिळणकर यांचा सिंहाचा वाटा आहे. तत्कालीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान चे अध्यक्ष महेश यांच्याकडे पाठपुरावा अनंत यांनी केलेला आहे. कुर्लीदेवी चा आशीर्वाद कायम पाठीशी आहे. नवीन कुर्ली वसाहत साठी मंजूर झालेली स्वतंत्र ग्रामपंचायत हे अनंत पिळणकर यांचे यश असल्याचे सांगत शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर याना वाढदीवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
अनंत पिळणकर यांचे नवीन कुर्ली गावासाठी मोलाचे योगदान – अतुल रावराणे











