कणकवली (प्रतिनिधी) : राजकारणापेक्षा समाजकारणात अग्रेसर असणारे अनंत पिळणकर आहेत. समाजहितासाठी झोकून देण्याचा त्यांचा पिंड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला कोल्हापुरातील मनसेचे पदाधिकारी, दोडामार्ग पासून ते अगदी वैभववाडी पर्यंत चे राजकीय पदाधिकारी उपस्थित आहेत यावरून अनंत पिळणकर यांनी राजकारणापेक्षा वैयक्तिक मैत्री जपलेली आहे हे दिसून येते. पिळणकर यांनी माणसांच्या मैत्रीची संपत्ती गोळा केली हे दिसून येते. समाजाची संवेदना समजून घेत जनतेची सुखदुःखे आपली मानून त्यांना मदतीला उभे राहणारे संवेदनशील व्यक्तिमत्व अनंत पिळणकर यांचे असल्याचे गौरवोदगार शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पिळणकर यांच्या वाढदिनी काढले. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अनंत पिळणकर – संदेश पारकर











