कणकवली (प्रतिनिधी) : राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपण्याची अनंत पिळणकर यांची हातोटी आहे. पिळणकर यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनी अभिष्टचिंतन करताना सांगितले.
यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा संघटक अर्चना घारे परब, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट,उद्योजक दीपक कदम,मनसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, प्रा. दिवाकर मुरकर, माधवी दळवी, सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विष्णूभाई पिळणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे,मनसे कोल्हापूर शहरप्रमुख प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.











