जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शिवसेना शहरप्रमुखपदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते बाळू पारकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी सभापती संदेश पटेल, जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर, महेश तेली, प्रशांत वनस्कर आदी उपस्थित होते.