आई वडलांच्या परिश्रमाचे विध्यार्थ्यानी चीज करावे – श्री. राजेंद्र पराडकर

चौके हायस्कुल वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सपंन्न


चौके( प्रतिनिधी ) : “विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व देणे गरजेचे आहे. आज जे उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी आहेत ते सर्व प्राथमिक – माध्यमिक मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले आहेत. मुलांनो आपल्या आई-वडील शिक्षकांनी तुम्हाला घडविण्यासाठी घेतलेले परिश्रम वाया घालवता नये. कामाव्यतिरिक्त मोबाईल न वापरता अभ्यास करुन यश प्राप्त करुन नावलौकिक मिळवावे. तसेच चौके पंचक्रोशीतील नुतन सरपंचानी सर्व शासकीय योजना राबवून गावाचा विकास करावा माझ्या मालवण तालुक्यातील या सातही नुतन सरपंचानी शासनाच्या योजना राबवून गावाचा विकास करावा यासाठी जिल्हा परिषदे मार्फत माझ्याकडून लागणारे सहकार्य असेल. आज सरपंच म्हणून सत्कार झाला त्या नुतन सरपंचानी विकास करुन सत्काराची पोचपावती द्यावी.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी चौके हायस्कूल येथे
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पंचक्रोशीतील सर्व सरपंच/उपसरपंच यांच्या सत्कार आणि कला व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. आणि संस्थेच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ- मुंबई आणि स्थानिक समिती संचलित भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पंचक्रोशीतील सर्व सरपंच , उपसरपंच यांचा सत्कार आणि कला व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर , मुंबई संस्था पदाधिकारी श्री. संतोष धुरी, विनायक गावडे, आर. जी. चौकेकर, शंकर गावडे, मुख्याध्यापक विजय गावंकर, प. स. सदस्य कमलाकर गावडे, चौके सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी. के. चौकेकर, आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर, उपसरपंच रविंद्र परब, नांदरुख सरपंच रामचंद्र चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर, साळेल सरपंच रविंद्र साळकर, उपसरपंच लक्ष्मण परब आंबडोस सरपंच सुबोधिनी परब उपसरपंच रामदास नाईक, कर्लाचाव्हाळ सरपंच रश्मी टेंबुलकर, उपसरपंच दिलीप गोवेकर, देवली सरपंच श्याम वाक्कर उपसरपंच हेमंत चव्हाण, शालेय समिती सदस्य धानजी चव्हाण, पालक संघ सदस्य भानजी गावडे, सुभाष राणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी गुणगौरव आणि उपस्थित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. चौके पंचकौशी शिक्षण प्रसारक मंडळ- मुंबई आणि चौके हायस्कुल स्थानिक समिती यांनी एकाच व्यासपिठावर गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा शैक्षणिक कार्यक्रम आणि पंचक्रोशीतील चौके, नांदरुख, आंबडोस, साळेल, देवली, आंबेरी, कर्लाचाव्हाळ या सात गावातील नवनिर्वाचित सरपंच- उपसरपंच-सदस्य यांचा भव्य सत्कार व शालेय मुलांनी कार्यक्रमाचे औचित्य साधत कला व विज्ञान प्रदर्शन असा त्रेविणी संगम जुळवून आणला.
वेदांन्त राणे राज लाड यांचा विषेश सत्कार
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये भालाफेक या प्रकारात राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या वेदान्त राणे याची निवड राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला तसेच विभागीय स्तरावर अनेक क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज लाड या दोघांचाही त्यांच्या माता पित्यासह विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक गावकर सर, स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुंबई संस्था अध्यक्ष संतोष धुरी, कमलाकर गावडे, आंबडोस सरपंच सुबोधीनी परब यांनी आपले विचार मांडले. संस्था पदाधिकारी संतोष धुरी, विनायक गावडे, अनिल सुकाळी यांनी कलादालन- विज्ञान प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यावर विद्यार्थ्यांनी काढलेली विविध चित्रे, विज्ञान प्रदर्शनातील साधने यांची उपस्थित मान्यवरानी पहाणी करत मुलांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!