डांबरट …अस्सल मालवणी चित्रपट १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण म्हंटल की हिरवा गार निसर्ग गर्द आमराई , नारळी फोफळी चा बागा आणि ओले सुके काजूगर . वरचा बाजूला निधड्या छातीचा सह्याद्री तर खालचा बाजूला अथांग समुद्र . जितका सुपीक आणि विविधतेने नटलेला आमचा कोकणातला निसर्ग . तितकाच सुपीक डोक्याचा आमचा कोकणी माणूस . कला क्रीडा, ते ज्ञान विज्ञान पर्यंत आणि जमिनीशी नाळ जोडलेली असली, तरी साता समुद्रा पार पर्यंत, इथल्या माणसाची कीर्ती . याच सुपिकतेचा जोरावर आज कोकणी माणूस दिवसेंदिवस वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा जगभरात उमटवत आहे.

कोकणी माणसात आणखीन एक कॉमन गोष्ट ती म्हणजे त्याचा DNAत जन्मत:च असलेला विनोदी डांबरट खोडकर पणा . सरळ त्याच्याशी सरळ नायतर समोरच्याला वठणीवर आणण्या साठी त्याला फक्त त्याचे युनिक मालवणी शब्दच पुरेसे असतात. अश्या ह्या जन्मतःच डांबरट माणसाची योग्य वाटचाल जशी त्याला साता समुद्रा पार घेऊन जाउ शकते तशीच अयोग्य वाटचाल रसातळाला पण नेऊ शकते. हाच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे . ही कथा आहे अश्याच एका डांबरट माणसाची. निसर्ग सौंदर्य आणि भूताखेतांचा गजाली पल्याडचा अविश्वसनिय अश्या कोकण मातीतल्या खमंग आणि खुशकुशीत गोष्टींची . ज्या गोष्टी आपण सगळ्यांनाच माहीत असतील. कुठे तरी ऐकलेल्या असतील. काही औंशी स्वतः अनुभवलेल्या देखील असतील. पण या गोष्टींचा नाद करायचा की नाही. त्यात गुरफटून जायचं की बाहेर पडायच. यावर आधारित हा चित्रपट आर.शिरवलकर फिल्म प्रोडक्शन या कोकणी मातीतल्या कोकणी बॅनर खाली बनला असून निर्माता व दिग्दर्शक रविकिरण शांताराम शिरवलकर या अवलीया अष्टपैलू आणि हरहुन्नरी कला काराने अत्यन्त मेहनतीने आणि स्थानिक कोकणी मातीतल्या आपल्या सहकारी मित्र व कलाकार यांचा मदतीने, अत्यन्त तुटपुंजा शुटिंगसाहित्याचा साहाय्याने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या फिल्मचे सवांद लेखन श्याम सामंत तर छायाचित्रण अवधूत लाड यांनी केलं आहे. तसेच यात…. मिलिंद गुरव, अक्षता कांबळी, सुहास वरूणकर, भावना कुलकर्णी, सिद्धेश कांबळी,अनुज कांबळी, मंदार शेट्ये, राहुल कदम, अमजद शेख, दिक्षा पुरळकर, महेश चिंदरकर, राजेंद्र रावले, विवेक वाळके, सिद्धेश खटावकर मुख्य भूमिकेत असून इतर दीडशे कलाकार या चित्रपटाचा महत्वाचा भाग आहेत. तसेच या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका ही या चित्रपटाला एक वेगळी उंची प्रदान करते.

हा चित्रपट एक अविसमर्णीय फॅमिली एंटरटेनर असून यात लव्ह स्टोरी, कॉमेडी, फॅमिली रिलेशन सह आपल्या आसपासचा समाजात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटनांवर प्रकाश झोत टाकण्यात आलेला आहे. तेव्हा नेमकं हे कोड आहे तरी काय ? अशी कोकणातील कुठली गोष्ट आहे जी या चित्रपटात आम्ही मंडलीय नेमकं काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायचं कुतूहल असेल तर दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संध्याकाळी 6 आणि रात्री 9 चा शो ला भरभरून प्रतिसाद द्या. आमचा डांबरट टीमचा या आगळ्या वेगळ्या प्रोयोगाचा तुमचा सम्पूर्ण फॅमिली सहित मनमुराद आनंद घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!