सौ सावंत या पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्षा
वैभववाडी (प्रतिनिधी) – ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे ची तहकूब विशेष ग्रामसभा आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाले या सभेमध्ये माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच दीपक चव्हाण यांनी सरपंच निवडणुकीआधी तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्ष पद हे रिक्त होते आज झालेल्या सभेमध्ये या पदाची निवड करण्यात आली यावेळी ग्रामसभेत हेमा प्रभाकर सावंत यांच्या नावाची सूचना ग्रामस्थ मोहन जंगम यांनी केली. व सदर सूचनेला नवलराज काळे यांनी अनुमोदन दिले व ठराव सर्वानुमते मंजूर झाला यामुळे सौ हेमा प्रभाकर सावंत या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. यावेळी सरपंच दीपक चव्हाण, ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, प्रियांका पाटील, विशाखा काळे, विलास जंगम, दीक्षा रावराणे, रोशनी बाणे, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, गंगाराम शिंदे, अंकिता डेळेकर, नाऊ बोडेकर, नंदकुमार रावराणे, हरिचंद्र माने, सुप्रिया चव्हाण, सुनिता पाटील, लक्ष्मण शेळके बबन शेळके, अंबाजी बोडेकर, महेंद्र शेळके राजेंद्र बोडेकर जयवंत बोडेकर प्रकाश शेळके, श्री पारखे, श्री धामणे,गंगाराम शेळके, अंगणवाडी सेविका सविता पाटील, मोहन जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील रूपाली रावराणे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.