नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ठीक 9 वा. श्री सत्यनारायण पूजा,11 पासून आरती,तिर्थप्रसाद,1 ते 2 पर्यंत महाप्रसाद, दुपारी 2 वा.स्थानिक भजने, दुपारी 3 ते 6 महीलांसाठी हळदीकुंकू समारंभ . सायंकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत 20-20 डबलभारी भजनांचा जंगी सामना गुंडू सावंत विरूद्ध संदीप लोके यांच्यात होणार आहे. रात्री 10 वा.कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ट्रीक सिन युक्त नाट्यकृती अजिंक्यतारा सादर होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सन्मित्र रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.