व्हरेनियम क्लाउड कंपनी कडून सावंतवाडी क्लीन सिटी साठी पुढचे पाऊल

सावंतवाडी नगरपरीषदेला ई कार्ट गाडी प्रदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : व्हरेनियम क्लाऊड या कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडी नगर परिषदेला “ई-कार्ट” गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी शहरातील अंतर्गत भागासह अडचणीच्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी वापरात येणार आहे. आज कंपनीचे संचालक विनायक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर, आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, विजय बांदेकर आदी कर्मचारी उपस्थित होते. सी. एस. आर फंडातून ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबतची मागणी सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून व्हरेनियम कंपनीकडे करण्यात आली होती. त्यानुसार ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सौ. नाडकर्णी यांनी सांगितले. या गाडीच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत भागात तसेच डोंगराळ भागातील कचरा उचलण्यासाठी मदत होणार आहे. अडचणीच्या ठिकाणी ही गाडी सहज नेता येणार आहे. ही गाडी आकाराने लहान असल्यामुळे कुठेही कचरा आणण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे त्याचा फायदा पालिकेसह नागरिकांना होणार आहे, असे नाडकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!